गुजरात विधानसभा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गुजरातच्या ३२ जिल्ह्यातील १८२ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. दरम्यान सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय. निकालापूर्वीच आपणच जिंकणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय.